Friday, April 30, 2021

झाडे जंगले तोडून तोडून ऑक्सजन संपवला

त्याच मिळालेल्या पैशाने तोच ऑक्सिजन बाटलीत भरला

गर्वाने फुगला माणूस स्वार्थाशिवाय काही दिसेना

प्राणी करतात मुक्त संचार आणि माणसांना घरात करमेना


तोंड दाखवायला जागा उरली नाही 

आता तोंड झाकून फिरावं लागतं

जे जे कर्म करावे ते ते

याच जन्मी भोगाव लागतं


गळे घोटले निसर्गाचे श्वास घेता येईना

पिंजऱ्यात बसले पक्षी स्वतःहून बाहेर पडता येईना




अक्कल

तुला काही अक्कल नाहीये

माहीत आहे 

माहीत आहे ? काय ?

हेच जे तू अत्ता म्हणलास ते ?

काय ?

मी काय म्हणालो ?

हेच 

काय हेच ?

तुला 2 सेकंद पूर्वी तू काय म्हणालास ते आठवत नाही का ?  बदाम खा

शांत बस्स

अरे तूच म्हणालास ना मला अक्कल नाहीये म्हणून. मग मी हो म्हणाले. 

धन्य आहेस तू 

हा ते तर आहेच. 

बर माझी अक्कल तुला कशी आठवली ?

 अरे हा, त्या श्वेता का सांगितलंस की आपण दोघे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड आहोत ते

हा मग काय झालं ? नाही आहोत का ?

आहोत ना पण सांगायची काय गरज होती ?

सांगितलं तर फरक काय पडतो ?

फरक काही पडत नाही पण ती गावगजर करेल 

मग करू दे त्यात काय

पण तू तिला का सांगितलंस ते सांग आधी

अरे ती मोठ्या मोठ्या पुड्या सोडत होती, माझा बॉयफ्रेंड असा आम्ही अस जातो फिरायला आम्ही तिथं जातो फिरायला 

मग यात तू कुठं आलीस ?

मला राग आला

ग्रेट

म्हणूनच म्हणालो तुला अक्कल नाहीये



Sunday, June 14, 2020

होय ना

मी जेव्हा जाईन कायमचा निघून
काहीजण हळहळतील, रडतील ही काही जण
पण मला माहित आहे भरलेल्या डोळ्यांनी
मला शिव्या देणारी तूच असशील
होय ना ?

अनोखं नात आहे तुझं माझं
ज्याला काही नाव नाही
तू जिंकणार असलीस तर मी हरायला तयार आहे
यात संशयाला काही वाव नाही
होय ना ?

जप स्वतःला, स्वतःची गरज जास्त असते इतर कोणा पेक्षाही
आपण हरतो स्वतःसमोर नेहमी
पूर्ण होत नाहीत कधी कधी साध्या सध्या अपेक्षा ही
होय ना ?

आयुष्य सुंदर आहे असं लोक म्हणतात म्हणून आपणही म्हणायचं
आपला रस्ता आपण शोधत चालत राहायचं
दूर कधी झालो तरी कायमच
नित्य नव्या वळणावर भेटत राहायचं
होय ना ?

©

Friday, May 29, 2020

अचानक पाऊस येतो मग कवी बाहेर येतात
मरगळलेल्या  मनाला मग नवीन धुमारे येतात

कवीला मग आठवते सोडून गेलेली ती
जाता जाता त्याचा जबडा तोडून गेलेली ती
तीच ती तिने किलोभर चुना त्याला लावलाय
आयुष्यभर आठवणीत राहील असा मस्तपैकी कोललाय

मग अचानक त्याच प्रेम जागृत होत
त्याला भूतकाळात नेऊन सोडतं
पावसाची सर जराशी कोसळून लपते
तिच्यावर लिहून लिहून याची वही देखील भरते

तृणपाती, कागदी होड्या आणि काय काय ते वर्णन
घरामध्ये नसलं तरी चालेल दोन वेळेचं सरपण
हौस असते भारी कवितांचा रतीब पाडायची
वाचकांवर होणाऱ्या अत्याचाराच त्यांना नसत दडपण

तरीही आपलं लिहीत राहायचं
पानभर लिहून सुद्धा कोणाला वाचायचं नसत
पावसाळ्यात उगवणाऱ्या कवीचं हेच दुःख असतं
पावसाळ्यात उगवणाऱ्या कवीचं हेच दुःख असतं
वयाच्या एका टप्प्यावर स्लॅमबुक लिहावी
काही आठवणी शब्दांमधून मांडता येतील
काही आठवणी अश्रूमधून सांडता येतील

बऱ्याच वर्षांनी जेव्हा धूळ खात पडलेली बुक जेव्हा सापडेल
तेव्हा एखादा खजिना सापडल्याचा आनंद होईल
मन भूतकाळात जाईल
काही क्षण पुन्हा अनुभवता येतील

माणसं कशी बदलतात
विचार कसे बदलतात
किती सहज जातात दूर माणसं
जी अगदी हृदयाच्या जवळ असतात

वेडंवाकडं हस्ताक्षर रंगबेरंगी शाई
ओळींवर ओळी भरण्याची घाई
वेड्यावाकडे शब्द ही मग जिवंत होऊ पाहतील
दुमडलेल्या पानांमधून आयुष्यामध्ये डोकावू पाहतील

चला पुन्हा एकदा भेटूया एकतरी पान लिहुया
पुन्हा जुने क्षण नव्याने आठवूया
पुन्हा जुने क्षण मनात कायमचे साठवूया
चला पुन्हा एकदा भेटूया

©अविनाश

Tuesday, May 19, 2020

आठवणी आणि संध्याकाळ

एवढं सोपं असतं का कोणाला विसरण ?
बटण दाबलं की आठवण आली आणि बटण दाबलं की आठवण गेली.
नक्कीच नाही.
अचानक किंवा ठरवून कोणीतरी आपल्या आयुष्यात येत. काही काळानंतर निघून जात. सहवास संपतो पण सोबत घालवलेले क्षण आठवणींचा फेर धरून कायम आपल्या भोवती फिरत असतात. काही सुखद काही दुःखद आठवणी ज्या आपला पिच्छा कधीच सोडत नाहीत. निदान जिवंत असेपर्यंत तरी.
संध्याकाळी कातरवेळी अचानक पाखरांचा थवा डोळ्यासमोरून सर्रकन सरकावा तश्या आठवणींचा थवा डोळ्यासमोरून निघून जातो आणि मन एकदम रिकामं होत. एक निर्वात पोकळी निर्माण होते आणि आपण त्यात आठवणी बसवत ते भरण्याचा निष्फळ प्रयत्न करत बसतो.
सगळं अस्ताव्यस्त पसरलेल्या पसऱ्यासारखं पडलेलं असत जे हवं ते सापडत नाही बाकी सगळं सापडत. अनामिक अशी हुरहूर मनावर दाटते आणि मग हळूहळू मन वेगळ्या दिशेने धावते. धावून धावून शेवटी थकून झोपून जाते मन.
डोळे उघडतात तेव्हा किर्रर्र काळोख पडलेला असतो. कधीही दूर न होणारा

Sunday, May 17, 2020

अजून काय...

अजून काय वाईट व्हायचं राहिलाय
माझं घर मी डोळ्यासमोर जळताना पाहिलंय

अजून भावनांचे किती घोटायचे गळे
एक एक स्वप्न माझं अश्रुनी न्हायलय

अजून किती वाट पाहायची पहाटेची मी
चांदण्याना अंधाराने चारी बाजूनी ग्रासलंय

जोरदार पाऊस आज बरसेल असं वाटतंय
आभाळ बघ काळाकुट्ट मेघांनी दाटलंय

काय काय हरवलंय हिशेब लागत नाहीय
कस आवराव कस सावराव जर नशीबच रुसलंय


१९-०९-२०११